vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

मुंबई प्रतिनिधी : मुंबईत डोगरा समाजाचा आक्रोश बघायला मिळाला. त्यांनी “जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. संतप्त निधी डोगरा यांनी सरकारला जाब विचारत म्हटले की, “ज्या उर्दू भाषेचे भाषिक जम्मू-काश्मीरमध्ये अवघे ४.५ टक्के आहेत, ती भाषा प्रशासन तेथील नागरिकावर लादली जात आहे. डोगरी, काश्मीरी, हिंदी आणि इंग्रजीसारख्या स्थानिक व सार्वत्रिक भाषांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”

कलम ३७० हटवूनही न्याय मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही आम्हाला समानतेच्या स्वप्नात अडकवून, भाषेच्या आधारे पुन्हा भेदभाव करत आहेत.” असा घणाघात करत डोगरा समाजाने सरकारच्या धोरणांवर थेट बोट ठेवले आहे.

डोगरा समाजाने “आमचं अस्तित्व, आमची भाषा, आमची ओळख… कुणाचं खाजगी राजकारण नव्हे!” असे ठणकावून सांगितले आहे.. या पत्रकार परिषदेनंतर राज्य व केंद्र सरकारवर डोगरा समाजाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी 05 बालविवाह थांबविण्यास यशस्वी…

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 वा वर्धापनदिन सोहळा* *राज्यपालांच्या हस्ते अनेक मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार*

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन