vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

 बुलढाणा, प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 व्या हप्त्याचा लाभ लवकरच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 99 शेतकऱ्यांची ई केवायसी आणि 4 हजार 433 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषि उपसंचालक अनुराधा गांवडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

000000०००

संबंधित पोस्ट

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले

महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक #सातारा नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश 

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे

vishwatmaklokswamivarta