vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते-अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते-अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

मुंबई, प्रतिनिधी : पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार आयुक्त, टाटा कंपनीचे अधिकारी यांना पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला 35 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत टाटा मोटर्सचे व्यवस्थापक, कामगार विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कामगार नेते आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, अपघातानंतर कामगारांच्या कुटुंबांची जबाबदारी कंपनीने घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित अधिकारी, पोलिस विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने पीडित कुटुंबाला 35 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला, हे समाधानकारक असल्याचे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पुढील काळातही व्याजाच्या स्वरूपात त्यांना आधार मिळणार आहे, असेही उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी सांगितले.

मृत्यू झालेल्या पुष्पेद्रकुमार यांना कंत्राटाचे काम दिलेले होते. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मे.टाटा मोटर्स यांनी पीडित कुटुंबाला 30 लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात आणि त्यावरील व्याजातून दर महिन्याला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेच, खर्चासाठी 5 लाख रुपये पीडित कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000

 

संबंधित पोस्ट

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत