vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…

जालना प्रतिनिधी-तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार वरखेडा (सिंदखेड) येथील सरपंच व त्यांच्या मुलाने गावातील शिक्षकाला रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिक्षकाच्या डोक्यात लोखंडी हुकने वार करून जखमी करण्यात आले असून, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तुळशीराम कमलाकर शेवाळे (वय 36), रा. वरखेडा सिंदखेड, हे श्रीरंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघुळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. 28 जुलै रोजी त्यांनी गावातील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची माहिती मिळाल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एक विनंती अर्ज पाठवला होता.

या प्रकाराचा राग मनात धरून, दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 29 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता शेवाळे हे राशन घेण्यासाठी लाईनमध्ये उभे असताना, सरपंच सर्जेराव शेवाळे व त्यांचा मुलगा प्रदीप शेवाळे यांनी त्यांना उद्देशून शिवीगाळ केली. यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण करत, प्रदीप शेवाळे यांनी पोते उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकने त्यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला

तसेच त्यांच्या पाठीवर, पोटावर मुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या पत्नी व मुलांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. यावेळी उपस्थित असलेले सोनाजी राजू शेवाळे, गोकुळ काटकर, मंदाताई घडलिंग व इतर ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकार पाहिला.

श्री. तुळशीराम शेवाळे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “माझ्या कुटुंबाला काहीही झाले, तर त्याला जबाबदार सरपंच सर्जेराव शेवाळे आणि त्यांचा मुलगा प्रदीप शेवाळे असतील.” या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत-शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

वंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार – मंत्री अतुल सावे