vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

अंबड, द(प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते, असे प्रतिपादन शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी केले.अंबड तालुक्यातील जामखेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. मगरे यांनी साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधतांनाअ‍ॅड. भास्करराव मगरे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासाहित्यातून अंध श्रध्देवर असुड ओढत पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नसूनकामगारांच्या हातावर उभी आहे, तर शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारसाहित्यातून पोवाड्यातून आणि गाण्यातून पटवून देण्याचे काम केले. १५०कथा, ३६ कांदबर्‍या पोवाडे आणि गाणे असे साहित्य निर्माण केले आणिसामाजिक चळवळ आणि जातीयेताविरुध्द आवाज उठवला. श्रमिकांसाठी लढा दिला. १ऑगस्ट रोजी जन्माला आलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे १८ जुलै१९६९ रोजी त्यांचे निधन झाले, असेही अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी सांगितले.यावेळी आण्णासाहेब बाळराज, जय खरात, भाऊसाहेब पांजगे, देवराव म्हस्के,संतोष पांजगे, पवार काका, गायकवाड यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा- मंत्री दत्तात्रय भरणे

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका.

गुंतवणूकदार उद्योजकांचे कोकण विभागात स्वागत..उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रशासन कटिबद्ध-विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा

vishwatmaklokswamivarta