vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

    अमरावती, प्रतिनिधी) : जिल्ह्यात काही कृषि निविष्ठा विक्री केंद्र युरिया खताची साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणे, तसेच इतर निविष्ठांची लिंकिंग करीत आहे. अशा कृषी केंद्राची तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.    कृषी केंद्राविरूद्ध कृषि विभागास प्राप्त तक्रारीबाबत खत निरीक्षकांमार्फत चौकशी करून कृषि निविष्ठा विक्रेत्‍यांनी खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्ग विविध तरतुदींचे उल्लंघन केले आहे, अशा कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे 2 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच 6 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

   शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रासायनिक खते योग्य दराने उपलब्ध होण्यासाठी तसेच कृषि निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी कृषी निविष्ठा रासायनिक खते एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणे, रासायनिक खतासोबत इतर निविष्ठांचे लिंकिंग करणे, रासायनिक खते उपलब्ध असून उपलब्ध करून न देणे, शेतकऱ्यांना बोगस खत विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करणेसाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

   तालुकास्तरावर 14 कृषी अधिकारी गुण नियंत्रण यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना तक्रार करता यावी यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आल आहे. सदर गुगल फॉर्मचे क्युआर सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर लावण्यात आले आहेत. सदर क्युआर स्कॅन करून शेतकरी तक्रार नोंदवू शकतात. तसेच व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवयाची असल्यास 8080536602 या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..