vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..

        नवी मुंबई प्रतिनिधी- तिरंग्याविषयीचा राष्ट्राभिमान जागृत करणा-या घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत आज विविध विभागांमध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत आयोजित या मोहीमा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे व मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या निरीक्षणाखाली राबविण्यात आल्या.

          यामध्ये बेलापूर व नेरूळ विभागांनी संयुक्तपणे ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ अमोल पालवे व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर तसेच बेलापूर विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर व नेरूळ विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री.अरूण पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्रभावी रितीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये 52 गोणी कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये एसआयईएस महाविद्यालयाचे एनएसएस युनिटचे विद्यार्थी, नागरिक तसेच स्वच्छताकर्मी सहभागी होते.

         वाशी विभागातही सहा.आयुक्त श्री. सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम. जयश्री आढळ यांच्या माध्यमातून वाशी मिनी सी शोअर जुहूगाव चौपाटी परिसरात टिळक कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी यांच्या सहयोगातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छताकर्मींसोबत नागरिकही सहभागी झाले होते.

         तुर्भे विभागात सेक्टर 10 सानपाडा येथील ट्री बेल्ट परिसरात सहा.आयुक्त श्री. सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत पिल्लाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत नागरिक व स्वच्छताकर्मींसह सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी केली.

         कोपरखैरणे विभागातही सहा.आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. राजूसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून सेक्टर 19 खाडी रोडवर सखोल स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

         या स्वच्छता मोहीमेत प्राधान्याने प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक, कापड, कागद अशा स्वरुपाचा कचरा संकलीत करण्यात आला व गोण्यांमध्ये भरुन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. यावेळी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली.000000

संबंधित पोस्ट

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक

इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक; इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा