vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी दहिसर टोल नाका पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल..

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यात २३ व २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

२५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

vishwatmaklokswamivarta

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…