vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊसदर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक झाली. बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (ऑनलाईन), सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच आमदार व साखर संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंके उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे एफआरपी दरानेच ऊसदर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना कायद्याने ठरवून दिलेला किमान दर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनांनुसार राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दर अदा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
00000

संबंधित पोस्ट

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील जनहिताच्या प्रमुख प्रकल्पांना निधी उपलब्ध करा – खा. डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. घाणेवाडी तलाव दुरुस्ती, आयसीटी कॉलेज, पाणी पुरवठा, प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला, पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची केली मागणी…

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनप्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!*व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय वारशाचा अवमान खपवून घेणार नाही* – हिंदु जनजागृती समिती

जालना येथील ऑल इंडिया केमिस्ट यांनी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन च्या देशपातळीवरील बंद 

राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ