vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई, प्रतिनिधी : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.

 यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, धरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटन, मासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती *गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात !* – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा  *गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान*

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड