vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नियोजनपूर्ण दर्जेदार कामांसाठी शासन आपल्या सोबत – उपमुख्यमंत्री अजित पवार

नियोजनपूर्ण दर्जेदार कामांसाठी शासन आपल्या सोबत – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– शहरात करावयाच्या विकास कामांचे आधी नियोजन करा. हे नियोजन परिपूर्ण झाल्यानंतर निधीची मागणी करा. नंतर दर्जेदार कामे करा व जनतेला उत्तम सुविधा, त्यासाठी शासन आपल्या नेहमी सोबत आहे, असे आश्वासन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरकरांना दिले.येथील श्री गणेश महासंघ उत्सव समिती २०२५-२६ च्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलजवळ हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट, विधानपरिषद सदस्य आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार संजय केणेकर, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्विराज पवार, विद्यमान अध्यक्ष अनिकेत निल्लावार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जनतेची कामे ही दर्जेदार व्हायला हवीत. निधी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करावयाच्या कामांचे नियोजन आधी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून करा. त्यानंतर प्रस्ताव द्या. योग्य कामाला निधीची कमतरता पडू देणार नाही. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बाधित झालेल्यांनाही पर्यायी सुविधा उपलब्ध करुन द्या. छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच २०० कोटी रुपये खर्चून उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर तयार करण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

गणेश महासंघाच्या उपक्रमात वृक्ष लागवड उपक्रमाचे स्वागत करुन प्रत्येक सदस्याने एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले. नशामुक्त अभियान राबवुन युवकांना योग्य दिशा देण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta