vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

📍 मुंबई/ठाणे-मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले आहेत. मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाण्यातील #नौपाडा तसेच कोपरीमधील #चिखलवाडी येथे साचलेले पाणी पंपाद्वारे काढण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. ठाण्यात २२५ मिलीमीटर पाऊस पडल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

वांद्रे येथील #मिठी नदी आणि नदी काठच्या परिसराचा त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी #पार्कसाईट येथे वर्षानगर या डोंगराळ वस्तीवर दरड कोसळलेल्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली.

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली आहे. मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बोटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta