vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

लातूर, प्रतिनिधी): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ९०, बीज भांडवल योजने अंतर्गत ९० आणि थेट कर्ज योजने अंतर्गत ३८ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://mahadisha.mpbcdc.in/schemes या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावी. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुकांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

विशेष लेख*महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय*

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

vishwatmaklokswamivarta

प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..