vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ….

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ….

मुंबई, प्रतिनिधी : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) राज्यातील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार १२ वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. २९ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती व प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्च‍ित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आर्टी या संशोधन संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी बार्टी संस्था करणार आहे.

११ महिन्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ११ महिन्यांकरीता यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, अराजपत्रित सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), न्यायिक सेवा (जेएफएमसी) आणि सहा महिन्यांसाठी बँक (आयबीपीएस), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), पोलीस- सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण खासगी नामांकित व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कालावधीकरीता विद्यावेतन

प्रशिक्षण कालावधीत दर महिना सहा ते १३ हजार रुपये विद्यावेतन त्यासोबत पुस्तक संच, बुट व इतर खर्चाकरिता एकवेळ १२ ते १८ हजार रुपये अनुषांगिक लाभ देण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत

0000

संबंधित पोस्ट

नांदगाव व बखारी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव सादर करावा- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

📢 *आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास शिक्षण विभागाकडे करा तक्रार* शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची माहिती