vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

रायगड प्रतिनिधी-जिल्ह्यातील नागरिकांना ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ (एमजेपीजेएवाय) यांचा लाभमिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून, यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील सदस्यांना ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’च्या माध्यमातून अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्ड कार्ड असणे बंधनकारक आहे.

याशिवाय आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच स्वस्त धान्य दुकानदार (रेशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही कार्ड तयार करता येईल. ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थी उपचार घेऊ शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष मोहिमेत सहभाग नोंदवून स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाने हे कार्ड बनविण्याची प्रक्रिया आता सुलभ केली असून, नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवरील ‘आयुष्मान अप’ डाउनलोड करून किंवा

https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन स्वतःच ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करता येईल.

संबंधित पोस्ट

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव- जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस