vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड! 

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड!

मुंबई प्रतिनिधी- खातेधारकांना पैसे देऊन त्याबदल्यात त्यांचे नावे असलेले बँक खाते आणि सिम कार्ड वापरण्यास घेणाऱ्या व त्याचा वापर करून नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखा कक्ष-२ यांनी पर्दाफाश केला आहे.

तपासात एकूण ९४३ बँक खाती वापरल्याचे समोर आले असून त्यापैकी १८१ खाती मुंबईत सायबर फसवणुकीसाठी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून २ लॅपटॉप, २५ मोबाईल फोन, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड व १०४ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

सायबर कंट्रोल रूम तसेच सायबर हेल्पलाईन १९३० वर आलेल्या तक्रारींवरून हे स्पष्ट झाले की नागरिकांची डिजिटल अरेस्ट, बनावट ऑनलाईन शॉपिंग व फसव्या शेअर ट्रेडिंग स्कीमद्वारे फसवणूक करण्यात आली होती.

संबंधित पोस्ट

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (CBN) ‘ऑपरेशन ब्लॅक हॉक्स’ अंतर्गत आंतरराज्य हेरॉईन तस्कर टोळीचा पर्दाफाश केला, 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त आंतरराज्य टोळीच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल.

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

कुख्यात गँगस्टर डी के रावला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने केलीय अटक

vishwatmaklokswamivarta

लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी..