vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘अधिस्वीकृती पत्रिका’ मिळविण्याची संधी; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘अधिस्वीकृती पत्रिका’ मिळविण्याची संधी; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी: श्रमजीवी, स्वतंत्र व्यवसायिक पत्रकार तसेच दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांनी अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी 5 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

    येत्या 13 आणि 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने, कोकण विभागाची पूर्वतयारी बैठक 8 सप्टेंबर, 2025 रोजी पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नवीन अर्जांवर निर्णय घेतला जाणार आहे.

     तरी ठाणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र पत्रकार आणि संपादकांनी तातडीने जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.5 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

मुंबईत दसरा आणि नवरात्र उत्सवासाठी ३०,००० पोलिस कर्मचारी तैनात

निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..