vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

राज्य प्रतिनिधी -राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव व मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते ठामपणे आंदोलन करत आहेत. सरकारने जरांगे पाटील यांच्या समाधानासाठी काय करावे, हा प्रश्न समोर आला आहे.

ओबीसी संघटनांनीही या आंदोलनास उत्तर देत उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध झाल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे येणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलकांची संख्या वाढू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाढू शकतो. त्यामुळेच राज्य सरकारने मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

या आदेशानुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत पोलीस उपस्थिती वाढवावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पोलिसांनी तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.

संबंधित पोस्ट

भय्यासाहेब आंबेडकर : फुले-आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील दुर्लक्षित पान: डॉ. संजय मून

vishwatmaklokswamivarta

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंपचा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर–हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन …

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भेट

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन 

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta