vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

    सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क असून ‍जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस दलाकडून मिरवणुकांचे मार्ग, महत्वाचे चौक, कृष्णा घाट, विसर्जनाची इतर ठिकाणे, संवेदनशील गावे, ठिकाणे व इतर ठिकाणी सतर्क पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गणेशोत्सव-2025 : प्रतिष्ठापना व विसर्जन माहिती

एकूण प्रतिष्ठापणा-दिड दिवस3 रा.4 था.5 वा 6 वा.7 वा.8 वा.9 वा.10 वा.अनंत चतुर्दशी नंतर 28/8 29/8 30/8,31/8मिरवणूक187650बिगर मिरवणूक 360-/20,32 एकूण-5861/362

गणेशोत्सव -2025 अनुषंगाने दि.3 सप्टेंबर 2025 अखेर घेण्यात आलेल्या विविध बैठका गावभेटी,गणेश मंडळाच्या बैठका,डॉल्बी/मंडपमुर्तीकार/देखावे सादर करणारे,मोहल्ला कमिटी,शांतता समिती पोलीस मित्र,पोलीस नागरीक समन्वय समिती,मशिदींचे मौलाना मौलवी,इतर विभाग समन्वय ,गणेशोत्सव-2025 अनुषंगाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत दंगा काबू रंगीत तालीम व इत,दंगा काबु रंगीत तालीम घेतलेली संख्या,दंगा काबु साहित्य सामग्रीची तपासणी रूट,गणेशोत्सव अनुषंगाने करण्यात आलेली दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई,भारतीय नागरीक सुरक्षा संहिताएमपीडीए,मपोका,प्रोव्ही 93168126,128129 170,11621गणेशोत्सव/ ईद-ए-मिलाद अनुषंगाने लावण्यात आलेला बंदोबस्त अपोअ,पो.उप.अधी,पोनि,सपोनि/पोउनि,पो.अंमलदार,होमगार्ड,एसआरपीएफस्ट्रायकिंग फोर्स,एकूण लावण्यात येणारा बंदोबस्त1         दोन दंगल नियंत्रण पथक (आरसीपी प्लाटून) प्रत्येकी 1 अधिकारी 30 अंमलदार यासह सर्व साहित्यानिशी सतर्क ठेवण्यात आलेले आहे. अचानक एखादी घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालय सांगली येथे 2 स्ट्रायकिंग, 2 दंगल नियंत्रण पथक व 1 क्युआरटी (शिघ्र कृती दल) राखीव ठेवण्यात आलेले आहे.          घातपात विरोधी पथक – गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद अनुषंगाने बॉम्ब शोधक व नाशक पथका मार्फत जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, संवेदशनशिल ठिकाणे, मर्मस्थळे, विसर्जन मार्ग, इ. 213 ठिकाणांची तपासणी करण्यात येत आहेसण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली पोलीस दलातर्फे दहशतवादी हल्ला व बॉम्ब स्फोटचे मॉक ड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात येत आहेत.    सोशल मिडीया मॉनिटरिंग – सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना सोशल मिडीया मॉनिटरींग करण्याकरीता नेमण्यात आले असून समाज माध्यमावर (फेसबुक, व्हॉटसअॅप, इंन्स्टाग्राम इ.) निगराणी ठेवण्यासाठी सायबर पोलीस ठाणेकडून मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यांचे मार्फत सोशल मिडीयावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आक्षेपार्ह बातमीच्या अनुषंगाने निगराणी ठेवण्यात येत आहे.मॉनिटरींग सेलकडून एकूण 82 आक्षेपार्ह पोस्टचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी 10 इसमांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  सण-उत्सव व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या पोस्ट, व्हीडीओ यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उत्सव शांततेत पार पडावा तसेच सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या संदेशांच्या अनुषंगाने उपविभागीय स्तरावर, पोलीस ठाणे स्तरावर, बीटस्तरावर, व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.      वाहतूक मार्ग बदलबाबत :- गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे नागरीकांच्या सुविधासांठी वाहतुक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत.मिरज शहरातील वाहतूक बदलाबाबत1) सोलापूर कडून मिरज म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने :- तासगाव फाटा – सुभाषनगर – विजयनगर मार्गे म्हैशाळ – कागवाड मार्गे कर्नाटककडे जातील. (परतीचा मार्ग हाच राहील.)

2) सोलापूर कडून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहने :- सोलापूर – पंढरपूर – गांधी चौक – वंटमुरे कॉर्नर – भारती हॉस्पीटल – विश्रामबाग – धामणी – अंकली – कोल्हापूरकडे जातील. (परतीचा मार्ग हाच राहील.)

3) शास्त्री चौक कडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने :-                             अ) कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने :- म्हैशाळ – शास्त्री चौक – महात्मा फुले चौक रेल्वे ब्राीज मार्गे कोल्हापूर कडे जातील.      ब) कोल्हापूर कडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने:- अंकली फाटा – रेल्वे ब्रीज – महात्मा फुले चौक – शास्त्री चौक – म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील.4) कृष्णा घाट मार्गे शिरोळ तालुक्याकडे जाणारी वाहने :-   अ) शास्त्री चौक – महात्मा फुले चौक – रेल्वे ब्रीज – अंकली फाटा – उदगाव मार्गे शिरोळ कोल्हापूरकडे ब) कृष्णा घाट मार्गे मिरज कडे येणारी वाहने कृष्णा नदीच्या पलिकडून उदगाव – अंकली मार्गे मिरजकडे.      सुभाषनगरकडून मिरजकडे येणारी वाहने :-      अ) सुभाषनगर – गाडवे चौक – वखार भाग – पंचशील चौक – मार्गे जवाहर चौक – शास्त्री चौक – मार्गाचा वापर करतील.      ब) सुभाषनगरकडून सांगली, एमआयडीसीकडे जाणारी वाहने दिंडीवेस – आळतेकर हॉल – शिंदे बंगला – कर्मवीर भाऊराव चौक – बसाप्पा हलवाई कॉर्नर – मिशन हॉस्पीटलच्या मार्गे सांगलीकडे जातील.i: अधिकार प्रदान आदेश – गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजीचे 00.01 वाजलेपासून ते दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.     बंदी आदेश – गणेश उत्सव कालावधीत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता जिल्हादंडाधिकारी सांगली यांचेकडील क्रमांक: गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बंदी आदेश/एसआर-27/2025. दिनांक 16 ऑगस्ट 2025. रोजीच्या आदेशानुसार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजीचे 00.1 वाजलेपासून ते दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीचे 23.59 या कालावधी व क्रमांक: गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बंदी आदेश/एसआर-30/2025. दिनांक 30 ऑगस्ट 2025 अन्वये दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत या कालावधी करीता 37 (1)(3) चा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.   प्लाझमा, बीम, लेझर बीम लाईट बंदी आदेश – गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाकडून लेझर लाईटचा वापर केल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो. म्हणून जिल्हाधिकारी, सांगली यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडील जा. क्र. क्रमांक: गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बंदी आदेश/एसआर-28/2025. दिनांक 20 ऑगस्ट 2025 अन्वये दि. 25 ऑगस्ट 2025 सकाळी 07.00 वा. ते दि. 7 सप्टेंबर 2025 चे 12.00 वा. पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता चे कलम 163 प्रमाणे लेझर लाईट मनाई आदेश करण्यात आलेला आहे.     ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम – गणेशोत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये अंमलबजावणी साठी प्रत्येक पोलीस ठाणेस ध्वनी मापक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली असून प्रत्येक पोलीस ठाणेत 1 पोलीस अधिकारी व 1 पोलीस अंमलदार अशा 25 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकांव्दारे ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करणेकरीता आजअखेर 283 गणेश मंडळांचे मिरवणूकांमध्ये ध्वनी मापन रिडींग घेण्यात आलेले असून 55 डेसीबल तीव्रतेपेक्षा जास्त ध्वनी मर्यादा ठेवणाऱ्या मंडळांवर पोलीस ठाणे स्तरावर 106 प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज सुरू असून ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.विसर्जन ठिकाणे – विसर्जनांचे ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, क्रेन, तराफे उपलब्ध ठेवणे, अग्नीशमन व जीवरक्षक पथके, पट्टीचे पोहणारे यांची टीम, वैद्यकीय पथक उपलब्ध केलेले आहे.

    छेडछाड विरोधी पथक – गणेशोत्सव काळात मिरवणूका व देखावे पाहण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रिया व मुली ही मोठ्या प्रमाणावर येत असतात त्यांची छेडछाड होवू नये व सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर छेडछाड विरोधी पथके तयार करण्यात आलेली आहेत.

 गुड मॉर्निंग पथके – जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गुड मॉर्निंग पथकांव्दारे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पुतळे, सर्व धर्मिय प्रार्थना स्थळे, संवेदनशील ठिकाणे या ठिकाणी दररोज भेटी दिल्या जात आहेत. याकरीता पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच मिश्र वस्ती व इतर प्रार्थना स्थळे, संवेदनशील ठिकाणी फिक्स पाँर्इंट नेमण्यात आले आहेत.

      अवैध धंदे कारवाई – जिल्ह्यातील अवैध धंद्याविरूध्द प्रभावी कारवाई करण्यासाठी एलसीबी कडील 2 अधिकारी 20 पोलीस अंमलदार यांची दोन पथके तयार केली आहेत. सदर पथकांव्दारे अवैध धंद्याविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. तसेच मिरवणूकीत गर्दीच्या ठिकाणी पाकीट मारी, मोबाईल चोरी होवू नये म्हणून एलसीबी व पोलीस ठाणेकडील डीबी पथके, साध्या वेषातील अधिकारी, अंमलदार तैनात करण्यात आलेली आहेत.

 सीसीटीव्ही व्हॅन व ड्रोन – सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने वाहनावरील सीसीटीव्हीद्वारे व ड्रोनव्दारे गणेश मंडळांच्या मिरवणूका यांचेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी कायर्कर्ते तसेच इतर सामान्य नागरीक यांनी आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

  गणेशोत्सव अनुषंगाने मिरवणुकांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून पाकीटमारी, चोऱ्या तसेच इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करणाऱ्या इसमांवर वाहनांवरील सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.     गणेशोत्सव मंडळ 10 कलमी उपक्रम – गणेशोत्सव अनुषंगाने पोलीस विभागातर्फे 10 कलमी कार्यक्रम राबविणेबाबत सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आलेले होते. त्यास प्रतिसाद देवून जिल्ह्यामध्ये 48 मंडळांनी रक्तदान शिबीर, 1 मंडळांने स्वच्छता मोहिम, 7 मंडळांनी आरोग्य शिबीर, 8 गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, बेटी पढाओ, बेटी बचाओ, अपघात आळा, स्त्री-भ्रुण हत्या असे प्रबोधनपर देखावे, 10 गणेश मंडळांनी नशामुक्ती अभियान, 34 गणेश मंडळांनी वृक्षारोपन कार्यक्रम, 8 गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून 31 गणेश मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांचा वार्षिक शैक्षणीक खर्च उचलला असून 2 मंडळांनी वही वाटप असे कार्यक्रम घेतलेले आहेत.      दत्तक/समन्वयक गणेश मंडळ योजना – गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हा शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा याकरीता दत्तक गणेशोत्सव मंडळ योजना तयार करण्यात आलेली आहे. सर्व गणेश मंडळांना दत्तक/समन्वयक नेमण्यात आलेला असून गणेश मंडळ पदाधिकारी/कार्यकर्ते यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून त्याद्वारे हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबधित पोलीस अंमलदार आपल्याकडे असलेल्या दत्तक मंडळाचे सर्व पदाधिकारी/ कार्यकर्ते यांच्याशी समन्वय ठेवत असून मंडळाच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती घेत आहेत. पालकत्व घेतलेल्या पोलीस अंमलदार हे मंडळाच्या आरतीसाठी नेहमी हजर राहतात. दत्तक मंडळाच्या मिरवणूक, विसर्जन दिनांक, वेळ याबाबतची माहिती, मिरवणूक मार्गाबाबतची माहिती, संकलीत करून त्याप्रमाणे योग्य नियोजन व कार्यवाही करत आहेत. गणेशोत्सव मंडळांकडून आक्षेपार्ह देखावा प्रसारित होणार नाही याची दक्षता घेत आहेत. गणेशोत्सव मंडळाकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत आहेत. गणेशोत्सव मंडळाला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणेसाठी प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण 5861 मंडळांना 81 अधिकारी व 1021 पोलीस अंमलदार यांनी दत्तक/समन्वयक घेतले आहे.: विशेष कार्यकारी दंडाधिकारी : जिल्हाधिकारी सांगली यांचेकडून गणेशोत्सव कालावधीकरीता कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळणेकरीता सर्व पोलीस ठाणेमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे      सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव अनंत चतुर्थी अनुषंगाने 1 अपर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 16 पोलीस निरीक्षक, 89 सपोनि/पोउनि, 538 पोलीस अंमलदार, 234 होमगार्ड, 74 वाहतूक पोलीस अंमलदार, 4 स्ट्रायकिंग फोर्स, 2 क्युआरटी (शिघ्र कृती दल), 2 दंगल नियंत्रण पथक व 1 एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. गणेशोत्सव दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सांगली पोलीस दल सतर्क आहे.

00000

संबंधित पोस्ट

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’; मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !**अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?* – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta