vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

जालना, प्रतिनिधी :- आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्याबाबतची योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम 24 नोव्हेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला आहे. तरी आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍ती अथवा वारस पत्‍नी, पतीने आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 02/01/2018 पुर्वी हयात नसल्यास त्‍यांच्‍या हयात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तींनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्‍याकरीता दि. 25सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा दि.27/06/2025 च्या शासन शासन निर्णयान्‍वये देण्यात आली होती. त्‍यानुसार अशा आणीबाणीधारकांच्या जोडीदारांनाही (पती/पत्नी) यांनी दि.27/06/2025 च्‍या शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांची अर्ज दाखल करण्याची मुभा राहील. तरी पात्र आणीबाणीधारकांनी विहित मुदतीत जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना येथे अर्ज सादर करावेत. मीसा/डी.आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या संबधीत जिल्हा पोलीस अधिक्षक/कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत. असे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.24 नोव्हेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेली व्‍यक्‍ती अथवा वारस पत्‍नी, पती यांनी नोंद घ्‍यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.

संबंधित पोस्ट

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं.

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta