vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी नवे आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी नवे आरक्षण जाहीर…

राज्य प्रतिनिधी –

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती व पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, निवडणूक नियम १९६२ अंतर्गत हा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी आदेशानुसार, महाराष्ट्रातील एकूण चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण अशा विविध प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ठेवून आरक्षणाचे वर्गीकरण केले आहे.

ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला आहे. तर ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे

अनुसूचित जातीसाठी बीड महिला, हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर महिला या जिल्ह्यांचे अध्यक्षपदे राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार, अहमदनगर महिला, अकोला महिला, वाशिम महिला या जिल्ह्यांचे अध्यक्षपदे आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी रत्नागिरी महिला, धुळे महिला, सातारा महिला, सोलापूर, जालना महिला, नांदेड, धाराशिव महिला, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यामध्ये प्रत्येक वर्गानुसार, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे. हे आरक्षण एकदाच लागू होणार असून, पुढील निवडणुकीत फेरबदल केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:ठाणे – सर्वसाधारण महिला, पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण, रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक – सर्वसाधारण, धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नंदुरबार – अनुसूचित जमाती, जळगाव – सर्वसाधारण, अहमदनगर – अनुसूचित जमाती महिला, पुणे – सर्वसाधारण, सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगली – सर्वसाधारण महिला, सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर – सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण, जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड – अनुसूचित जाती महिला, परभणी – अनुसूचित जाती, हिंगोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धाराशिव – सर्वसाधारण महिला, लातूर – सर्वसाधारण महिला, अमरावती – सर्वसाधारण महिला, अकोला – अनुसूचित जमाती महिला, वाशिम – अनुसूचित जमाती महिला, बुलढाणा – सर्वसाधारण, यवतमाळ – सर्वसाधारण, नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, वर्धा – अनुसूचित जाती, भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया – सर्वसाधारण महिला, चंद्रपूर – अनुसूचित जाती महिला, गडचिरोली – सर्वसाधारण महिला.

संबंधित पोस्ट

ठाणे येथील कोलशेत खाडी येथे अनधिकृत रेती उत्खनन करणारे 1 बार्जेस व 2 सक्शन पंप नष्ट

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी