vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने इयत्ता ८ वी ते १२ वी आणि पदवी स्तरावर संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ स्पर्धा राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून संविधानाबाबत प्रभावीरीत्या जनजागृती करावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संविधान प्रश्नमंजुषा जनजागृती मोहिमेबाबत आयोजित बैठकीत दिल्या.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी इयत्ता ८ वी ते पुढील इयत्तांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्व शाळांमधून जनजागृती करण्याचे आवाहन करत उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, युवा करिअर संस्था आणि आयोगाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा यशस्वीरित्या राबविण्यात यावी. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमधून जिल्हास्तरावर, त्यानंतर विभाग आणि राज्य स्तरावर निवड करावी. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धेसाठी संबंधित विभागांनी आर्थिक तरतूद करावी.

बैठकीला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव श्री. कुलकर्णी, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, युवा करिअर संस्थेचे मुनाल थूल, आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी सुरज मुनेश्वर आदी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;6 मार्चपर्यंत मुदत

नवी मुंबई शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक – २०२६ निकाल घोषित

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हाधिकारी कार्यालयात 101 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान – ⁠101 पिशव्या रक्त संकलित

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…