vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा
आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) – 2025 परीक्षा रविवार दि. 23 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्याचे नियोजित असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर 1) व इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर 2) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थींनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. 15 सप्टेंबर, 2025 पासून सुरू झाली असून दि. 03 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पर्यंत परीक्षार्थींना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील.
कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी याप्रमाणे- ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी – दि. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 2025, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे- दि. 10 ते 23 नोव्हेंबर 2025, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ- रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 13.00, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ -रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 वेळ दुपारी 14.30 ते 17.00
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षाथ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000

संबंधित पोस्ट

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा उपनगरी रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रेल्वे प्रवाशांची उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, सन 2026-27 साठी एकूण 751 कोटी 8 लाखांचा प्रारूप आराखडा मान्य- उद्या राज्यस्तरीय बैठकीत आराखडा सादर होणार

vishwatmaklokswamivarta

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा