vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

     अमरावती, प्रतिनिधी: आयुष्मान भारतअंतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिर, रेवसा येथे जिल्हास्तरीय गोवर-रुबेला विशेषलसीकरण अभियान मोहिमेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. हा कार्यक्रम श्री. चतुरजीउके अनुदानित आश्रमशाळा, रेवसा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशअसोले यांच्या हस्ते झाले

 निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आदी उपस्थित होते.यावेळी गोवर-रुबेला या आजारांविषयी सविस्तर माहिती देत,लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.गोवर आणि रुबेला निर्मूलनासाठी प्रत्येक मुलापर्यंतलसीकरण पोहोचणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.डॉ.सुरेश असोले यांनी गोवर व रुबेला हे संसर्गजन्य आजारमुलांसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगितले.५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ‘एम.आर. विशेष अभियान’ महत्त्वाचे आहे, आणि आदिवासी आश्रमशाळांमधीलमुलांपर्यंत लसीकरण पोहोचणे ही खरी गरज आहे, असे ते म्हणाले.डॉ.प्रवीण पारिसे यांनी गोवर-रुबेला लसीकरण पूर्णपणे होणेहीच प्राथमिकता असल्याचे नमूद केले.प्रत्येक मुलाला लस मिळालीच पाहिजे, असा आरोग्य विभागाचादृढनिश्चय असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. संदीप हेडाऊ यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांचेआरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले.लसीकरणामुळे विद्यार्थ्यांना रोगांपासून संरक्षण मिळतेआणि त्यांच्या शिक्षणात अडथळे येत नाहीत, असेही ते म्हणाले.

  ****

संबंधित पोस्ट

कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न-कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

vishwatmaklokswamivarta

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे नवी मुंबईत यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन