vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

राज्य प्रतिनिधी-प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी ७५० गावांमध्ये सदर स्वच्छता अभियान राबवले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले गेले. गावागावांत रस्त्यांपासून शाळांच्या परिसरापर्यंत, बाजारपेठांपासून सार्वजनिक स्थळांपर्यंत युवकांनी झाडू हाती घेत स्वच्छता सेवा केली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.

 मंत्री श्री लोढा म्हणाले की पंतप्रधानांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील युवकांनी स्वच्छ भारताच्या संकल्पनेसाठी घेतलेला पुढाकार अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नेहमी सांगतात की स्वच्छता केवळ एका दिवसासाठी नाही तर ती आपल्या दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावी. मला विश्वास आहे की आज स्वच्छता अभियानात सहभागी झालेली तरुण पिढी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देईल आणि स्वच्छ भारतासाठी नेहमीच प्रयत्न करेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आम्ही जनमानसात रुजवला. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त केलेली स्वच्छता सेवा अभूतपूर्व ठरेल.

संबंधित पोस्ट

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

vishwatmaklokswamivarta

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…