vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

बुलढाणा, द प्रतिनिधी) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिनस्त मेन रोडवर स्थित असलेले (10×20) सात गाळे 12 हजार रुपये प्रती गाळ्याप्रमाणे प्रतिमाह विद्युत बीला व्यतिरिक्त भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच वीरपत्नी यांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे 22 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांची नोंदणीकृत बँक पतसंस्था, माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, विधवा (वैयक्तिक व्यवसाय), इतर नागरिक कार्यालयाचे गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी असा प्राधान्यक्रम ठरवून दिलेला आहे.

गाळ्यांची जमा करण्यात येणारी सुरक्षा अनामत रक्कम एका वर्षाचे भाडे राहील. करारनामा जिल्हा निबंधक कार्यालय यांच्याकडे नोंदणी करुन भाडे करारनाम्याचा कालावधी दोन वर्ष राहील. भाडेकरु यांनी सादर केलेले अर्ज सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून मंजूर झाल्यानंतर करारनामा अटी व शर्तीनुसार करण्यात येईल व बाध्य राहील. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी 

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना

लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण-करण्याकामी 15 दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक  –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta