vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

राज्य प्रतिनिधी :- अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

नांदेड जिल्हा-ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ शेतकऱ्यांचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. यासाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

शासन निर्णय 18.09.2025 R&R GR_Jun25_Nanded_553Cr,परभणी जिल्हा,जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांचे १ लाख ५१ हजार २२२.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांना १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

सातारा जिल्हा,जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या पावसामुळे १४२ शेतकऱ्यांचे २१.६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. त्यासाठी शासनाने ३ लाख २३ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

सांगली जिल्हा,जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे १३ हजार ४७५ शेतकऱ्यांचे ४ हजार ७४.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ७ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय 18.09.2025 R&R GR_Jun25_136Crनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात शासन संवेदनशील असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांच्या पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनाने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. तसेच, नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत यासाठी संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.

 

०००००

संबंधित पोस्ट

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..