vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत…

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गावांना पुराचा वेढा बसला असून, काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचीही माहिती आहे.

या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ पूरग्रस्त भागांचा दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्री सोलापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांची पाहणी केली. त्यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली. ‘नुकसान मोठं असून पंचनाम्याला वेळ लागेल,’ असे अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्याची पाहणी करणार आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम,डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती..

vishwatmaklokswamivarta