vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

बुलढाणा, द प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई पीक पाहणी – डीसीएस ची 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 अंतिम मुदत देण्यात आली आहे. शतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पेरा स्वतः ई पीक पाहणीव्दारे नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2025 ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 463380.47 हे. आर एवढ्या क्षेत्रावर, तसेच एकूण 836037 पीक पाहणी करावयाच्या मालकी प्लॉटपैकी 479683 प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पीक पाहणी डीसीएस व्हर्जन 4.0.0 या मोबाईल अॅपद्वारे आपल्या सातबारावर नोंदणी केलेली आहे. आजवर जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 61.79% क्षेत्रावर झालेली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी अॅपव्दारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पीक पाहणीची नोंदणी ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.0 या मोबाईल अपव्दारे करतांना अॅन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. हा अप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पीक पाहणी अॅपव्दारे शेत बांधावर जावून पीकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. या कामी संबंधित शेतकऱ्यांजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधित गावाचे तलाठी. कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेवून आपल्या पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अॅपव्दारे करून घेण्यात यावी. या अॅपविषयी काही अडचण असल्यास संबंधित गावाचे तलाठी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील डीसीएस करिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी.

ई-पीक पाहणीव्दारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या सातबारावर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती याबाबत पीक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.29 सप्टेंबर पर्यंत मुमुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**