vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक

 

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंध खाते करत आहे

प्राप्त माहितीनुसार-*चंद्रकांत सुधाकर सरोदे (वरिष्ष्ट पोलीस निरीक्षक ),राहुल रमेश वाघमोडे (पोलीस उप निरीक्षक ) दोन्ही अटक आहेत.**यशस्वी सापळा कारवाई*  दि. 26/09/2025 ▶️ *युनिट – मुंबई*▶️ तक्रारदार- पुरुष वय-59 वर्ष▶️ ला प्र वि गुन्हा नोंद क्रमांक 31/ 25 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम.▶️1) आलोसे – चंद्रकांत सुधाकर सरोदे वय 52 वर्ष, पद- वरिष्ष्ट पोलीस निरीक्षक, वडाळा टी टी पोलिस ठाणे2) राहुल रमेश वाघमोडे वय 37 पोलीस उप निरीक्षक, वडाळा टी टी पोलीस ठाणे, मुंबई ( दोन्ही आरोपी अटक आहेत)

▶️ लाच मागणी रक्कम- रुपये   आलोसे क्र 1 साठी 4,00,000/-(चार लाख रुपये)आलोसे क्र 2 साठी 30,000/- ( तीस हजार रुपये ) ➡️ लाच पडताळणी दिनांक – 17/09/2025 & 22/09/2025➡️ स्विकारली लाच रक्कम दिनांक:- 26/09/2025 रोजी आलोसे क्र 1 यांनी चार लाख पैकी पहिला हप्ता पहिला /- 2,00,000/- ( दोन लाख रुपये ) तर आलोसे क्र 2 यांनी 26/09/2025 रोजी 30,000/- ( तीस हजार रुपये ) पंचासमक्ष स्वीकारले. ▶️ कारण-    तक्रारदार यांचे एका व्यक्ती बरोबर त्यांचे समाजाचे हॉल संबंधाने वाद आहेत. दिनांक 07/09/2025 रोजी तक्रारदार व त्यांचे विरुद्ध गटामध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटाचे लोक वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे जमा झाले. त्यावेळी विरुद्ध गटाचे तक्रारीवरून यातील तक्रारदार यांचे विरुद्ध पो ठाणेस गुन्हा दाखल आहे.  सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचे मुलीस आरोपी न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध असलेल्या गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आलोंसे क्र 2 यांनी स्वतःसाठी 50,000/- रु व आलोंसे क्र 1 साठी 5,00,000/- रु ची मागणी करुन दि 10/09/2025 रोजी स्वतःसाठी 20,000/- रु तर सापळा कारवाई वेळी दि 26/09/25 रोजी 30,000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारले. तर आलोंसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना मागणी केलेल्या 5,00,000/- रु मध्ये तडजोडी अंती 4,00,000/- स्वीकारण्यास संमती देऊन आज दि 26/09/25 रोजी त्यापैकी पहिला हप्ता रु 2,00,000/- स्वतः स्वीकारले त्यावेळी दोन्ही आरोपी लोकसेवक यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. ▶️ *पर्यवेक्षण अधिकारी* श्री. कृष्णा मेखले पोलीस निरीक्षक ला.प्र. वि . मुंबई ▶️ *गुन्हा तपास अधिकारी* श्री नितीन थोरात पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि., बृहन्मुंबई .▶️ *मार्गदर्शक अधिकारी* -मा.श्री संदीप दिवाण अपर पोलिस आयुक्त,  ला.प्र.वि, मुंबई  मा. श्री.अनिल घेरघेरडी अपर पोलीस उप आयुक्त, ला.प्र. वि, मुंबई

   मा श्री. राजेंद्र सांगळे   अपर पोलीस उप आयुक्त,  ला.प्र. वि, मुंबई ▶️ *सक्षम अधिकारी*- मा. पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई ==========*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*मनीषा झेंडे*सहायक पोलिस आयुक्त (प्रशासन)9881128129/839093973अँन्टी करप्शन ब्युरो, बृहन्मंबई विभाग, सरपोचखानवाला रोड, वरळी, मुंबई.**@ दुरध्वनी क्रं. 022 24921212 022 24922618*@ टोल फ्रि क्रं. 1064

संबंधित पोस्ट

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये जप्त केलेली ६८,३८,६३५ रुपयांची मालमत्ता मालकांना परत करण्यात आली.

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

पुण्यात भररस्त्यात रिक्षा चालकावर  गोळीबार आणि कोयत्याने वार, आंदेकर टोळीचे कनेक्शन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

vishwatmaklokswamivarta