vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

        सांगली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

      नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ब्लॉक नं. 102, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे फेरफार अदालतीचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta