vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

लातूर, प्रतिनिधी : चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून पिकांचे नुकसान, चाऱ्याची उपलब्धता याविषयी माहिती घेतली.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा शिवारातही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार श्री. कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

****

संबंधित पोस्ट

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta