vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

*सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

सातारा प्रतिनिधी: राज्य शासनाकडून अनुकंपा नियुक्ती बाबतचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण जाहिर करण्यात आलेले आहे. या धोरणानुसार मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चीत करुन देण्यात आलेला आहे. सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण आणि महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा 2023 मधील शिफारस प्राप्त उमेदवारांना लिपीक-टंकलेखक पदाचे नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री

शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.4 ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी 11 वा. स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

 कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी, कार्यालय प्रमुख व नियुक्ती प्राधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ही श्री. पाटील यांनी केले आहे

0000

संबंधित पोस्ट

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

मुंबईच्या धारावीतील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद..

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन झालेल्याबीडीडी चाळीच्या सदनिकांचे #चावी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात ‘आरएसएस @१०० : अ सेंच्युरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाइस’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.