vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाष दिन संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाष दिन संपन्न

ठाणे, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील समिती सभागृहात आज अभिजात मराठी भाषा दिन संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, प्राध्यापक बेडेकर महाविद्यालय श्रीमती प्रज्ञा पंडित, जिल्हा मराठी समिती सदस्य श्री.राजेश राणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री.सर्जेराव म्हस्के पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) श्री.सचिन चौधर, तहसिलदार (संगायो) श्री.संदिप थोरात, तहसिलदार (रेतीगट) श्री.अमोल कदम आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी मराठी भाषा विषयी बोलताना म्हणाले की, मराठी भाषेला जुनी परंपरा आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषा ही मातृभाषेप्रमाणेच असली पाहिजे. तिला महत्व दिले पाहिजे. संवाद साधण्याचे कौशल्य आपल्या मातृभाषेत असले पाहिजे. पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. पुस्तके जर आपल्या मातृभाषेत असतील तर वाचताना वेगळाचा आनंद मिळतो. दि.3 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

बेडेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्रीमती प्रज्ञा पंडित यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मराठी भाषा छान गोड बोली भाषा आहे. मराठी भाषेला 3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. त्याची वर्षपूर्ती होत आहे. अभिजात मराठी भाषा दिन साजरा करीत असताना मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली गेली पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर हा दिवस महत्वाचा आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय याबद्दल माहिती दिली. जगामधील बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा 10 क्रमांक लागतो तर भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा 4 क्रमांक लागतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मराठी समिती सदस्य श्री.राजेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा.इतर भाषेतील कलाकारांचा कलेशी संबंध आल्यावर मराठी भाषेमध्ये उत्तम संवाद साधता येतो. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पाणी हक्क समितीच्यावतीने ‘सर्वासाठी पाणी ‘अहवाल सादर…