vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

जालना, प्रतिनिधी) :- जालना शहरातील सिरसवाडी रोडवर टी. व्ही. सेंटर जवळ महिला व बालविकास कार्यालयाकडून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कुलभैय्या अनाथालयाची (शिशुगृहाची) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी भेट देऊन पाहणी केली.

सदरील शिशुगृहात 0 ते 6 वर्षापर्यंतच्या कुमारी मातांची मुले, मुलांमध्ये ज्यांचे आई-वडील दोघेही मृत आहेत अशी अनाथ मुले, जन्मानंतर पालकांनी सोडून दिलेली किंवा रस्त्यावर, रुग्णालयात आढळलेली मुले यात ,कायद्याच्या संरक्षणाखालील मुले यात बाल न्याय (संरक्षण व काळजी) अधिनियम 2015 अंतर्गत येणारी मुले, जसे की विशेष काळजीची गरज असलेली मुले ज्यांना विशेष काळजी व सुविधा आवश्यक असतात यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत या ठिकाणी 3 मुली आहेत. व यांची काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याठिकाणी मुलांना बालस्नेही वातावरण निर्माण करणे, मुलांना खेळणी उपलब्ध करुन देणे तसेच परिसरात मुलांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत आदेशित केले. तसेच जिल्हातील दानशूर व्यक्ती, सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी याठिकाणी राहत असलेल्या मुलांना मदत करण्याचे आवाहन केले. महिला व बालविकास कार्यालयाकडून या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र कड, परिविक्षा अधिकारी अमोल राठोड यांच्या सह शिशुगृहातील कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta