vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक खाती, संस्थाची खाती आणि सरकारी योजनेच्या खात्यामध्ये दावा न केल्या ठेवी असून त्या संबंधित खातेदारांना उपलब्ध करून देण्याकरता सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने सर्व बँकांच्या सहयोगाने जिल्ह्यात 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांनी दिली.

ज्या खात्यांमध्ये मागील 10 वर्षात व्यवहार झालेले नाहीत अशा निष्क्रिय खात्यांमधील ठेवी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. खातेदारांनी पैसे गमावलेले नाहीत त्यांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात. त्याकरीता खातेदारांनी आपल्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. दावा न केलेल्या ठेवींचा जलद निपटारा सुकर करण्यासाठी विशेष मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 25 या कालावधीत संपूर्ण देशात सर्व बँकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. दावा न केलेल्या या ठेवी संबंधित खातेदारांना देण्याकरीता सातारा जिल्ह्यामध्ये सर्व बँकांच्या माध्यमातून जनजागृती शिबीरांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरीता खातेदारांनी, मयत खातेदारांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता आपल्या बँक शाखेत करून ठेवी परत घ्याव्यात असे आवाहन श्री. नितीन तळपे यांनी केले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण