vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत सोमवारी

जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत सोमवारी

 सांगली, प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषद, 61- निवडणूक विभागाच्या, जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर व 10 पंचायत समितीचे, 122- निर्वाचक गणाचे संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेस हजर राहण्याचे आहे त्यांनी संबंधित ठिकाणी विहीत वेळेत हजर रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 जिल्हा परिषद सांगली साठी एकूण 61 गट असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सभा होणार आहे.

 पंचायत समिती निहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – 8 गण, पंचायत समिती आटपाडी येथील बैठक सभागृह, ता.आटपाडी, जि.सांगली. जत – 18 गण, तलाठी भवन, तहसिल कार्यालय जतच्या आवारातील. खानापूर – 8 गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव – 8 गण, बैठक सभागृह, तहसिल कार्यालय कडेगाव, पहिला मजला. तासगाव – 12 गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव. कवठेमहांकाळ – 8 गण, मा. आर आर (आबा) पाटील सभागृह, पंचायत समिती कवठेमहांकाळ. पलूस – 8 गण, तहसिल कार्यालय पलूस, पहिल्या मजल्यावरील सभागृह. वाळवा – 22 गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह इस्लामपूर. शिराळा – 8 गण, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, तहसिल कार्यालय शिराळा. मिरज – 22 गण, मा. श्री. वसंतरावदादा पाटील सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती मिरज. वरील नमूद सभेच्या ठिकाणी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय– मंत्री शंभूराज देसाई भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना,अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी वेगवान समनव्यन’सचेत’ प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती,२४ ते २६ मे दरम्यानच्या अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य; गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे