vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ संपन्न

उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- वीर मुरारबाजी देशपांडेशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था/शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, महाड, जि.रायगड येथे राज्य शासनाच्या निर्देशानुसार अल्पमुदत अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन सोहळा मोठ्या (दि.8 ऑक्टोबर रोजी) उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने मुंबई येथे करण्यात आले. स्थानिक सोहळयाचे उद्घाटन प्रविण कृष्णा सुतार, विश्वकर्मा लाभार्थी, महाड यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष निवास प्रभाकर चव्हाण (सिनि. मॅने. प्रोडक्शन-प्रिवी) तसेच प्रमुख पाहूणे जयेश अशोक देशपांडे, उद्योजक महाड आणि अंजली सचिन सेळके (ॲसि. मॅने. एचआर-सविता ऑईलटेक्नॉ. लिमि. महाड) तसेच आयएमसीसदस्य उपस्थित होते.या अंतर्गत विविध रोजगारक्षम अल्पमुदत अभ्यासक्रम राबवले जाणार असून, प्रशिक्षणार्थीना इलेक्ट्रिकल, वेल्डींग, केमिकल, फिटर फैब्रीकेशन, अशा क्षेत्रातील प्रशिक्षण मिळणार आहे. याचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक कौशल्य देणे, त्यांना रोजगारक्षम बनवणे ,स्थानिक उद्योगांशी जोडण्याची संधी मिळवून देणे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

०००००००

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta

प्रशासनात सकारात्मकतेने काम करुन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न