vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

            सांगली, द प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ सांगली व जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांनी सर्व प्रकारचे कारखाने विशेषतः बंद कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित कारखाना मालकांना सूचना कराव्यात, त्यांना त्याचे फायदे समजावून सांगावे, अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार यांनी दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार म्हणाले, ज्या मेडिकल दुकानात सीसीटीव्ही अद्याप बसविलेले नाहीत त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत औषध प्रशासनाने सूचना द्याव्यात. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे परिसरात 100 ते 200 मीटरच्या आत किती पान टपऱ्या सध्या अस्तित्वात आहेत याची माहिती समितीस द्यावी.

   पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या लोकांसाठी व्यसनमुक्ती केंद्राची निर्मिती करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या, त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या 20 बेड असलेले व्यसनमुक्ती केंद्र चालू करत असल्याबाबत तसेच लवकरच यापेक्षा मोठे व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करण्याबाबत काय योजना करता येईल याबाबत माहिती सांगितली.

        उप प्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आरटीओ कार्यालय सांगली यांच्याकडून चारचाकी वाहनावर लावण्यासाठी तयार करण्यात आलेली अंमली पदार्थ विरोधी स्टिकर्स समितीसमोर सादर केली. तसेच अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या व त्याबाबत गुन्हे दाखल होणाऱ्या लोकांचे वाहन परवाने रद्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   लवकरच पावसाळा चालू होणार असून अमली पदार्थ लागवड होऊ नये या करिता महसूल, वन व कृषी विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात तपासणी करावी व काही माहिती मिळाली तर ती पोलीस विभागास द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून बैठकीत करण्यात आले.

 

000

संबंधित पोस्ट

लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद -व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधित यंत्रणांना निर्देश

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta