vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रियदर्शनी कॉलनी संभाजीनगर येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करा- भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

प्रियदर्शनी कॉलनी संभाजीनगर येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करा- भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना, द (प्रतिनिधी) – प्रियदर्शनी कॉलनी, संभाजी नगर लक्कडकोट परिसरात महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.यावेळी निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजी नगर, लक्कडकोट, पासी चौक, कांबळेचा मळा, माणिक नगर, शिवाजी नगर म्हाडा कॉलनी, ढवळेश्वर, शेर सवार कॉलनी, भोकरदन नाका, सकलेचानगर, जिजामाता कॉलनी, ढवळेश्वर, हिंद नगर, शिक्षक कॉलनी अशा अनेक वसाहतींत हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्व भागांचा मुख्य केंद्रबिंदू संभाजी नगर परिसर असूनदेखील येथे एकही आरोग्य सेवा केंद्र नाही. स्थानिक नागरिकांना लहान-मोठे आजार झाल्यास उपचारासाठी मोठ्या घाटी रुग्णालयात किंवा खासगी दवाखान्यात जावे लागते. गरीब नागरिकांना उपचारासाठी लागणारा खर्च परवडत नाही, तर घाटी रुग्णालयात रांगा आणि विलंबामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे परिसरात महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले आहे.

यावेळी भाजपा शाखा अध्यक्ष राजेस देसार, उपाध्यक्ष अनिल नवमहलकर, सचिव शेखर पवार, सागर घुगे, विकास नखलव, पुरुषोत्तम सोसे, कृष्णा नखलव आदींची उपस्थिती होती.lबाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

धारावी विभागात रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा कारनामा -दहा दिवसात दोन वेळा डांबरी ठिगळ लावून धारावीतील किरकोळ रस्ता दुरुस्ती..

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळाने नवीन वर्षात घरकुल योजना- दोन हजार हून अधिक सदनिकांसाठी भव्य गृहनिर्माण सोडत 

vishwatmaklokswamivarta

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta