vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतुन 75 टक्के अनुदानावर 5 एचपी मोटरपंप संच, पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर्स, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स, मानवचलीत स्पायरल सीड सेपरेटर, विद्युत चलीत चाफ कटर, मानवचलीत टोकनयंत्र (डिबलर) साहीत्य पुरविणे प्रस्तावीत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अधिक माहिती करीता संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडे संपर्क साधावा. तसेच योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे दि. 30 ऑक्टोंबर 2025 पर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना- पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta