vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात मुंबई सह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात मुंबई सह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

राज्य प्रतिनिधी-राज्यात मुंबई सह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यातील विविध भागांत विजेच्या गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच वादळी वारे वाहू शकतात, त्यामुळे दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोकण – गोवा पट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस, तसेच तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वारा येण्याची शक्यता आहे. कोकण किनाऱ्यावर मच्छीमार व किनाऱ्यावर रहिवाशांना विशेष खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. समुद्रातील परिस्थितीदेखील अस्थिर आहे. वादळी वा-याचा हा जोर सव्वीस ऑक्टोबर असाच दिसतो आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मुंबई शहराचं कमाल तापमान सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान सुमारे पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात हवामान अस्थिर झालं आहे आणि वारा, पाऊस येण्याची शक्यता वाढली आहे. खासकरुन, किनारी भागात राहणाऱ्यांसाठी हे अधिक चिंतेचे कारण आहे.

वादळी वारा असल्यामुळे झाड पडू शकतात. त्यामुळे झाडांपासून लांब राहावे आणि घराच्या छतावर हलक्या वस्तू ठेवू नयेत, त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. समुद्रकिनाऱ्याजवळ किंवा मच्छीमारीमध्ये असलेल्या लोकांनी समुद्रात जाणं टाळावं. विजा आणि गडगडाटाची शक्यता असल्यामुळे उघड्यावर किंवा उंच झाडाखाली उभे राहाणे टाळावे. अशा सूचना मान विभाग आणि प्रशासनाने स्थानिकांना दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta