vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, प्रतिनिधी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ट असले तरी पुन्हा नव्याने पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रात्रीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्या भारताचे आधारस्तंभ – प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक