vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेश

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले.

राज्य प्रतिनिधी-कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल), कोची द्वारे बांधण्‍यात येणाऱ्या आठ ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स’ (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी ) पैकी पहिले जहाज ‘माहे’ काल ( 23 ऑक्टोबर, 2025 रोजी) भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले.

केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमधील ऐतिहासिक बंदराचे नाव दिलेले ‘माहे’ भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे.

नौदल जहाजबांधणीमध्ये भारत वेगाने स्वावलंबी होत असून ‘माहे’ त्याचे एक प्रतिबिंब आहे आणि सीएसएलने या जहाजाची स्वदेशी पद्धतीने रचना आणि निर्मिती केली आहे. उथळ पाण्याखाली देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (लिमो), पाणबुडी विरोधी युद्धासाठी (एएसडब्ल्यू) सुसज्ज आहे आणि त्यात प्रगत ‘माइन लेइंग’ क्षमता आहे. जवळपास 78 मीटर उंची आणि सुमारे 1,100 टन वजनाचे हे जहाज पाण्याखालील युद्धात उत्कृष्ट कामगिरी करते. ज्यामध्ये टॉर्पेडो, बहु-कार्यात्मक पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत ‘रडार’ आणि ‘सोनार’ यांचा समावेश आहे.

अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचा समावेश केल्यामुळे भारतीय नौदलाची एएसडब्ल्यू क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, आणि त्यामुळे किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा वाढेल. 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरण्‍यात आल्यामुळे ‘माहे’ ची निर्मिती आणखी एक मैलाचा दगड ठरली आहे. ही गोष्‍ट सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दृष्टिकोनाला आणखी बळकटी देणारी आहे

संबंधित पोस्ट

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!**महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक*

कारगिल विजय दिवसाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ यांच्या उपस्थितीत ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सायक्लोथॉन; अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta