vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

ठाणे, प्रतिनिधी):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.03 नोव्हेंबर 2025 ते दि.12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षनार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

तरी ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक उमेद्वारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-63 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या SSB वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून यावेत:-(अ) कंबाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (ब) एनसीसी ‘C’ सर्टिफीकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शीफारस केलेली असावी. (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा SSB साठी शीफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी: training-pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.0253-2451032 व भ्रमणध्वनी क्र.9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा] असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (नि.) यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

हिंदी दिवसानिमित्त दुर्गामाता विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta