vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

राज्य प्रतिनिधी -भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीमध्ये सुरू होणार असून, डिसेंबर 2025 पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभर विस्तारण्यात येणार आहे.

ही योजना सहकार मंत्रालय आणि ई-शासन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवली जाणार आहे. या सेवेसाठी ‘भारत टॅक्सी’ नावाचे विशेष मोबाईल अनुप्रयोग तयार करण्यात आले आहे. प्रवासी या अ‍ॅपच्या माध्यमातून टॅक्सी सहज बुक करू शकतील, चालकाचे स्थान पाहू शकतील तसेच प्रवासाचा अंदाजे वेळ आणि भाड्याची माहिती मिळवू शकतील.

या टॅक्सी सेवेत महिलांसाठी विशेष सुरक्षितता बटण, आपत्कालीन संपर्क सुविधा, डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि चोवीस तास ग्राहक सेवा उपलब्ध असेल. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपन्यांच्या तुलनेत ‘भारत टॅक्सी’ सेवेचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी असतील.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे..

गडांचा राजा : राजगड

vishwatmaklokswamivarta

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश