vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे .

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे …

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्यावतीने #लातूर , #परभणी, #हिंगोली, #नांदेड जिल्ह्यातील लाभार्थींसाठी कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे दि.30 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे, तरी या मेळाव्यात लाभार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने लातुर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील लाभार्थ्याकरीता श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर, नांदेड या सभागृहात दि.30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता “ #कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व #प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर #मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या योजनेतील पात्र, निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण करण्यात येणार आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा #व्यवसाय सुरू करण्यासाठी, लाभार्थींना तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी केले आहे.

अधिक माहितीस्तव संपर्क –इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय यांचे संकेतस्थळ :- obcbahujankalyan.maharashtra.gov.inमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई – 400 071 संकेतस्थळ :- www.msobcfdc.org

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,पहिला मजला, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,गुलमोहर क्रॉस रोड न.09,जे.व्ही.पी.डी., विलेपार्ले (पश्चिम), मुंबई 400 049 संकेतस्थळ :- www.vnvjntdc.org

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

25 सप्टेंबर रोजी रोप-वे हिरकणीवाडी येथे रंगीत तालीमीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील त्रुटींची पुर्तता करुन अर्ज फेरसादर करावेत

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

vishwatmaklokswamivarta