vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी भरती12 नोव्हेंबर, 2025 रोजी थेट मुलाखत

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी भरती12 नोव्हेंबर, 2025 रोजी थेट मुलाखत

छत्रपती संभाजीनगर, ( प्रतिनिधी : येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेमध्ये विविध अशासकीय पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. यामध्ये सुतार, शिपाई, ग्राऊंडम्सन, स्वयंपाकी, मसालची, सफाईगार, वाहनचालक, डिटिपी ऑपरेटर व सहायक लिपिक यांचे प्रत्येकी एक (01) पदे आहेत. तरी जास्तीत जास्त माजी सैनिक व इतर इच्छूक पात्र उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सेक्टर-एन-12, सिडको येथे दि. 12 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या संबंधित आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त)मकरंद देशमुख यांनी केले आहे.

सुतार ते वाहनचालक पदांसाठी 10 वी पास पात्रता आहे तर डिटिपी ऑपरेटर पदासाठी 12 वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. सहायक लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता असून संगणक हाताळण्याचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य राहील. तसेच सर्व पदांसाठी माजी सैनिक उमेदवारांस प्राधान्य असणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या मोबाईल क्रमांक 9767150477 अथवा 0240-2991370 या क्रमांकावर संपर्क साधावा

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

🏆 २१ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम – मंत्री डॉ. अशोक वुईके आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे महिला कुस्ती स्पर्धेसाठी दरवर्षी ५० लाखांचा निधी शासनाकडून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला प्रारंभ; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन