vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

एम.सी.ई.डी. तर्फे मंगळवारी (दि.४) उद्योजकता विकास प्रशिक्षण

एम.सी.ई.डी. तर्फे मंगळवारी (दि.४) उद्योजकता विकास प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ४ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी छत्रपती संभाजी नगरध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक-युवतीकरिता १ महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय निवडीचे तंत्र, उद्योजकता विविध संधी, बाजारपेठेचे पाहणी, शासकीय उद्योजकता योजना धोरण, शासकीय योजनांचा अनुशेष विषयक संपुर्ण माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योजकाची व्यक्तिमत्व विकास, विविध उद्योजकांची भेटी, व्यवसायास लागणारे परवाने, आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योग, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक व केमिकल उद्योग, कृषी माल प्रक्रिया उद्योग, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन प्रक्रिया उद्योग आदी सर्व विषयांवर तज्ञ व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

या संधीचा लाभ युवक युवती व उद्योग करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन श्री. सुदाम थोटे, विभागीय अधिकारी, एम.सी.ई.डी. , छत्रपती संभाजी नगर यांनी केले आहे. प्रवेशाची अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सौ. आशा कुरवडे, मो. 7888070419 , मुख्यालय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), अ-३८ एमआयडीसी परिसर, रेल्वे स्टेशन रोड, येथे संपर्क साधावा.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार