vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ  

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद ठाणे) — ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,सुलभ आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्करोग निदान मोबाइल व्हॅन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही मोहीम ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून व्हॅन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून रुग्णांचे जीवन वाचविणे आणि जनजागृती वाढविणे हा आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की,“ही मोबाइल व्हॅन ग्रामीण भागातील आणि दुर्गम ठिकाणांतील नागरिकांसाठी मोठे वरदान आहे. वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर यशस्वी उपचार शक्य आहेत.”
या मोबाइल व्हॅनमध्ये मुख कर्करोग,स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रमुख प्रकारांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. रुग्णालयापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
कर्करोग निदान मोबाइल व्हॅनचे वेळापत्रक (ठाणे जिल्हा)  | अ. क्र. | तालुक्याचे नाव | भेट दिनांक |
| १ | भिवंडी | दि. ०३/११/२०२५ ते दि. ०८/११/२०२५ |
| २ | कल्याण | दि. १०/११/२०२५ ते दि. १३/११/२०२५ |
| ३ | अंबरनाथ | दि. १४/११/२०२५ ते दि. २०/११/२०२५ |
| ४ | मुरबाड | दि. २१/११/२०२५ ते दि. २४/११/२०२५ |
| ५ | शहापूर | दि. २५/११/२०२५ ते दि. २९/११/२०२५ |नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
000

संबंधित पोस्ट

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

vishwatmaklokswamivarta

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!

माय भारततर्फे ‘नशामुक्त युवा -विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन